एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी ! अकोले ;- अकोले तालुक्यातील महत्वाची शिक्षण संस्था असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीतील विश्वस्त मंडळातील एका पदाधिकाऱ्याची लवकरच हकालपट्टी केली जाणार आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.या संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने सर्वच नियम पायदळी तुडवित हुकुमी पद्धतीने बिनबोभाटपणे कारभार चालविला आहे.तसेच संस्थेतील शिक्षकांशी हुज्जत घालणे,त्यांच्या पगारात,सेवा निवृत्ती वेतनात आडकाठी आणणे,अशा अनेक प्रकारच्या गंभीर तक्रारी या कायम विश्वस्थांकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे संस्थेच्या वतीने या पदाधिकाऱ्याच्या विरोधात 40 तक्रारींचा पाढा असलेला एक कागदच माजी मंत्री मधुकरराव पिचड व संस्थेच्या कायम विश्वस्थांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरी पर्यंत या संस्थेची एक मिटिंग होणार असून या मिटिंगमध्ये या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी केली जाणार आहे.या पदाधिकऱ्याने अकोले तालुका एज्युकेशन सोसा...