संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

संगमनेर - संगमनेर महसूल खात्याची परवानगी न घेता व्यवसायासाठी जागा वापरल्या बद्दल अकोलेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर संगमनेरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.
        संगमनेर शिवारातील गुंजलवाडी येथे शेती कसण्यासाठी घेतलेल्या जमिनीत विना परवानगी बेकरी प्रोडक्ट, लोखंडी खिळे आदी व्यवसाय अनधिकृतपणे सुरू केल्याबद्दल अकोले येथील सुभाष भागूजी कानवडे,गणेश भागूजी कानवडे व बाळकृष्ण धोंडीबा भागवत (रा.गुंजाळवाडी) यांच्यावर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी सचिन संपतराव गुंजाळ यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कोणत्याही शासकीय परवानग्या न घेता त्या जमिनीवर बेकायदेशीरपणे व अनधिकृतरित्या वेगवेगळ्या मोठ्या शेड उभारून त्यात व्यावसायिक उत्पादने घेत असल्याची हरकत सचीन गुंजाळ यांनी घेतली होती.त्यानुसार
या प्रकरणी संबंधित बांधकाम हे एम.आर.टी.पी.ऍक्टच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून हा प्रकार करण्यात आला.त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 45 अनव्ये अनधिकृत अकृषिक वापर व अनधिकृत विकासकामे या संदर्भात महसूल विभागाने ही कारवाई केली.या कारवाईची प्रत महसूल विभागाने शासनाच्या www. eqcourts.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध केली आहे.यात अकोले तालुक्यातील शिवसेनेचा वादग्रस्त पदाधिकारी अडकल्याने तालुक्यात तर्क वितर्कांना पून्हा उधाण आले आहे.



कोट - या प्रकरणातील गणेश भागूजी कानवडे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर दोन महिन्यांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सध्या हा आरोपी जामीनावर बाहेर असून त्यावर महसूल विभागाने पुन्हा कारवाई केल्याने अकोले तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !