अकोले तालुक्यात आघाडीत बिघाडी !
शिवसेनेला बैठकीचे आमंत्रणच नाही
अकोले - अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली.मात्र या बैठकीला सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण न दिल्याने अकोले तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा सुरू आहे.
सध्या अकोले तालुक्यात नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत.त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर या निवडणुकांची चर्चा रंगत आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राष्ट्रवादी पक्षाचे आ.डॉ.किरण लहामटे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,युवानेते अमितदादा भांगरे,माकपचे डॉ.अजित नवले,सुरेशराव खांडगे,काँग्रेसचे सोन्याबापू वाकचौरे,अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.मात्र या बैठकीला शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण नसल्याने ते या बैठकीला गैरहजर राहिले.या बैठकीत नगर पंचायत व कारखाना निवडणुकी बाबत रणनीती देखील आखण्यात आली.मात्र शिवसेनेच्या एकाही पदाधिकऱ्याला आमंत्रण नसल्याने ही बैठक अधिक चर्चेची ठरली.अकोले तालुक्यात शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे.यापूर्वी झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेला दोन नंबरची मते पडली आहेत.त्यामुळे पिचडांना सत्तेतून दूर करायचे असेल तर शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे.अन्यथा हाताने पायावर धोंडा पाडून घेतला अशी गत पिचड विरोधकांची झाल्याशिवाय राहणार नाही.आज झालेल्या या बैठकीबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिली आहे.
कोट - शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीचे शिवसेनेला आमंत्रण नव्हते.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.त्यामुळे शिवसेना हा सत्तारूढ पक्ष असल्यामुळे अकोले तालुक्यातील निवडणुकांमध्ये जागांचे समसमान वाटप होणे गरजेचे आहे.अकोले तालुक्यात शिवसेना हा मोठा पक्ष आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्हाला बैठकांचे आमंत्रण देणे गरजेचे आहे.अन्यथा आम्हाला ही स्वबळाची तयारी ठेवावी लागेल.
मा.श्री.मच्छिंद्र धुमाळ
शिवसेना तालुकाप्रमुख
संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई
संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई संगमनेर - संगमनेर महसूल खात्याची परवानगी न घेता व्यवसायासाठी जागा वापरल्या बद्दल अकोलेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर संगमनेरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर शिवारातील गुंजलवाडी येथे शेती कसण्यासाठी घेतलेल्या जमिनीत विना परवानगी बेकरी प्रोडक्ट, लोखंडी खिळे आदी व्यवसाय अनधिकृतपणे सुरू केल्याबद्दल अकोले येथील सुभाष भागूजी कानवडे,गणेश भागूजी कानवडे व बाळकृष्ण धोंडीबा भागवत (रा.गुंजाळवाडी) यांच्यावर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी सचिन संपतराव गुंजाळ यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कोणत्याही शासकीय परवानग्या न घेता त्या जमिनीवर बेकायदेशीरपणे व अनधिकृतरित्या वेगवेगळ्या मोठ्या शेड उभारून त्यात व्यावसायिक उत्पादने घेत असल्याची हरकत सचीन गुंजाळ यांनी घेतली होती.त्यानुसार या प्रकरणी संबंधित बांधकाम हे एम.आर.टी.पी.ऍक्टच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.कायद्यातील...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा