आमदार साहेबांच्या नावाखाली पीएची जोरदार वसुली !
आमदार साहेबांच्या नावाखाली पीएची जोरदार वसुली !
अकोले -अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या एका स्वीय सहाय्यकाची शासकीय अधिकारी व ठेकेदारांकडून जोरदार वसुली सुरू आहे.
मी जनतेचा आमदार आहे,मला दोन नंबरचा एक रुपया पण नको,फक्त विकासकामे क्वालिटीबाज करा,असे डॉ.किरण लहामटे आमदार झाल्यानंतर छातीठोकपणे ठेकेदारांना सांगत होते.त्यामुळे सुरुवातीला अनेक विकासकामांना गती तर मिळाली अन कामे सुद्धा उच्च दर्जाची झाली.मात्र गेल्या काही दिवसांपासून आ.लहामटे यांनी ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क न ठेवता आपल्या स्वीय सहाय्यकाला सर्वाधिकार बहाल करून टाकले.त्यामुळे या पीएने आमदार लहामटे यांच्या स्वच्छ कारभाराला हरताळ फासायला सुरुवात केली.या पीएने आपला स्वतःचा फायदा पाहत ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांकडून राजरोसपणे वसुली करण्यास सुरूवात केली आहे.या प्रकरणाचे काही पुरावे व रेकॉर्डिंग देखील अकोले टाईम्सकडे उपलब्ध आहेत.ज्या आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पारदर्शी कारभाराला डोळ्यासमोर ठेऊन अकोलेकरांचा विश्वास संपादित केला.त्याच आमदारांच्या पीएने विकासकामांच्या मोबदल्यात 5 ते 10 टक्क्यांची मागणी अधिकारी व ठेकेदारांकडे करावी,हे लांच्छनास्पद आहे.नाशिक येथील आदिवासी विकास विभाग,लघु पाटबंधारे कार्यालय अकोले,सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर अकोले यासारख्या अनेक ठिकाणांहून या पीएने आमदार महोदयांच्या नावाखाली वसुली केली आहे. या वसुलीची सीमा आता "आकाशा"एवढी झाल्याने स्वतः ठेकेदार व काही अधिकारी समाज माध्यमांसमोर येऊन आपली खंत व्यक्त करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून या पीएचे शौक देखील बड्या लोकांसारखे झाले असून तो सर्वसामान्य लोकांना जरा ही किंमत देत नाही.या पीएच्या करामतीला आमदार साहेबांचा एक विश्वासू सहकारी देखील खतपाणी घालीत आहे.या पांढऱ्या शुभ्र सहकाऱ्यावर सर्वच कार्यकर्त्यांची नाराजी असून कानामागून आला अन तिखट झाला,अशा प्रतिक्रिया त्याच्याबद्दल कार्यकर्ते देत आहेत.आमदार डॉ.लहामटे यांनी या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.अन्यथा पाणी डोक्यावरून गेल्या शिवाय राहणार नाही.
कोट - दुचाकीवर फिरायला महाग असणाऱ्या या पीएने नवीकोरी चारचाकी आलिशान गाडी खरेदी केली आहे.एकीकडे आपण फार सज्जन असल्याचा आव आणायचा अन दुसरीकडे आमदार साहेबांच्या नावाखाली पैसे काढायचे,असा गोरखधंदा या पीएचा सुरू आहे.कामांमध्ये जास्त टक्केवारी भेटावी म्हणून या महाशयाने पिचड समर्थक ठेकेदारांना देखील अनेक कामे बहाल केली आहेत.
जर या सबंधित पुरावे तुमच्याकडे असतील तर ते पुढे आणा अन्यथा हे ब्लॅकमेनिंग करणार्या पत्रकारांसारखे आरोप तुमच्यावर देखिल होतील आपण हे पुरावे व अॅाडिओ क्लिप तालुक्यातील जनतेसमोर आनाल हि आशा करतो
उत्तर द्याहटवाजर या सबंधित पुरावे तुमच्याकडे असतील तर ते पुढे आणा अन्यथा हे ब्लॅकमेनिंग करणार्या पत्रकारांसारखे आरोप तुमच्यावर देखिल होतील आपण हे पुरावे व अॅाडिओ क्लिप तालुक्यातील जनतेसमोर आनाल हि आशा करतो
उत्तर द्याहटवा