गुरव जोडो व गुरव समाज जनगणना अभिनयास सुरुवात

संगमनेर – अखिल गुरव समाज संघटनाच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथील यशोधन हॉलमध्ये अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर उत्तर पदाधिकारी बैठक घेऊन, गुरव जोडो व गुरव समाज जनगणना अभिनयास शुभारंभ झाला.

महाराष्ट्रात गुरव समाज मोठ्या संख्येने असूनही जनगणने अभावी संख्या निश्चित नसल्याने समाजाचा राजकीय प्रभाव पडत नाही. म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाने अखिल गुरव समाज संघटने मार्फत होणाऱ्या जनगणनेत सहभागी व्हावे. गुरवांची संख्या कळाल्यावर समाजाचा राजकीय दबाव तयार होईल, असे अखिल गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शिंदे म्हणाले. ते संगमनेर येथे आयोजित केलेल्या समाज बांधवांच्या बैठकीत बोलत होते.

             

या वेळी संघटनेचे मानद अध्यक्ष वसंत बंदावणे सर, सुरेखा ताई तोरडमल,महिला प्रदेश अध्यक्ष, सुभाष (अण्णा)शिंदे, मुख्य सरचिटणीस, मनिषा ताई पांडे,महिला मुख्य सरचिटणीस, अशोक पांडे,राज्य कार्याध्यक्ष, संजय घोडके,राज्य उपाध्यक्ष, रमेश क्षिरसागर,देवस्थान समिती सरचिटणीस यांनी मार्गदर्शन केले, तसेच शारदा ताई शिंगाडे,महिला उपकार्यकरी अध्यक्ष, प्रशांत चौधरी,उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब घोडके,सरचिटणीस, दत्ता बंदावणे,अकोले ता.अध्यक्ष, भरत खंदारे,संगमनेर ता.अध्यक्ष, नंदू चौधरी, नवनाथ पांडे, ज्ञानेश्वर चौधरी, दत्ता पांडे,डॉ. जयवंत गुरव,बन्सी भाऊ पांडे,अंबादास पवार,ठाकरे सर,विश्वास पवार, सुभाष पांडे, बाळकृष्ण देवाडे, रामनाथ शिंदे, दत्ता खंदारे, प्रकाश पांडे,गणेश खंदारे, सोमनाथ पांडे, रावसाहेब शिंदे, नवनाथ देवाडे, बबन शिंदे, बापू चौधरी, मंगेश पांडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष प्रशांत चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना अशोक पांडे व आभार राज्य उपाध्यक्ष संजय घोडके यांनी आभार मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

कृषी विधेयक शेतकऱ्यांना बांधावर जाऊन समजावून सांगा !