अकोलेत दानवेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन !

अकोलेत दानवेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन !

अकोले - शिवसेनेच्या वतीने भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून अकोले शहरात आंदोलन करण्यात आले.
          केंद्रीय मंत्री दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना बाबत अजब विधान केले होते.आंदोलनाला बसलेले शेतकरी हे बांगलादेशी असल्याचे विधान दानवे यांनी केले होते.त्यामुळे संपूर्ण देशभर दानवेंच्या या विधानाची निंदानालस्ती करण्यात आली.अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने ही आज अकोले शहरातील कोल्हार घोटी राज्य मार्गावर दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.भाजप सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी बिल मागे घ्यावे,अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे,तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ,युवानेते महेशराव नवले,प्रदीप हासे,नितीन नाईकवाडी,अतुल लोहटे,
माधवराव तिटमे,भाऊसाहेब गोर्डे, शारदा शिंगाडे,युवानेते महेश हासे,प्रमोद मंडलिक,गणेश कानवडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी ;- अमोल शिर्के

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !