अकोले बंदचे उद्या मंगळवारी आवाहन !
अकोले बंदचे उद्या मंगळवारी आवाहन !
अकोले :-केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ अकोले शहरात उद्या मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या बंदच्या नियोजनासाठी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर एक बैठक पार पडली.या बैठकीस सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्याच्या विरोधात उद्या भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.या आवाहनाला अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.या बैठकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवली आहे.या बैठकीस शेतकरी नेते डॉ.अजित नवले,कॉम्रेड कारभारी उगले,अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी,विनय सावंत,विलास नवले,दत्ता नवले,शांताराम सांगारे,दादा पाटील वाकचौरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी,आरिफ तांबोळी,नितीन नाईकवाडी,गणेश कानवडे,अमित नाईकवाडी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा