अकोले शहरात कडकडीत बंद !
अकोले शहरात कडकडीत बंद !
अकोले :-केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे पारित केले आहे.या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अकोले बंदचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अकोले शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पाठींबा दर्शविला.आज सकाळपासून एका ही व्यापाऱ्याने आपले दुकान उघडले नाही.तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात एकत्र जमून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला.

हा बंद यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, शेतकरी नेते डॉ.अजित नवले,कॉम्रेड कारभारी उगले,अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब नाईकवाडी,विनय सावंत,विलास नवले,दत्ता नवले,शांताराम सांगारे,दादा पाटील वाकचौरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल नाईकवाडी,आरिफ तांबोळी,नितीन नाईकवाडी,गणेश कानवडे आदींनी परिश्रम घेतले.अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक,कळस खुर्द व तालुक्यातील इतर ही गावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.
प्रतिनिधी अमोल शिर्के
मोबा- 9922820204
प्रतिनिधी अमोल शिर्के
मोबा- 9922820204
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा