भाजप महिला मोर्चाचा उद्या संगमनेरला मेळावा !
भाजप महिला मोर्चाचा उद्या संगमनेरला मेळावा !
जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांची माहिती
अकोले - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित संगमनेर येथे महिला मेळाव्याचे उद्या बुधवार दि.3 मार्च 2021 रोजी आयोजन केले असल्याची माहिती भाजपच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांनी दिली.

या महिला मेळाव्यास भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे या आवर्जून उपस्थित राहणार आहे.या मेळाव्यातून उत्तर नगर जिल्ह्याची महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.संगमनेर येथील डेरे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आवारात दुपारी चार वाजता हा महिला मेळावा पार पडणार आहे.या मेळाव्यास विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे,भाजपच्या प्रदेश सचिव मा.आ.स्नेहलताताई कोल्हे,धनश्रीताई सुजय विखे पाटील,महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी,तथा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अँड वर्षाताई डहाळे,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सुरेखाताई विध्ये,महिला मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्ष शैला मुळक, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर,जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन भाऊ दिनकर हे ही उपस्थित राहणार आहे.या महिला मेळाव्यात आत्मनिर्भर भारत योजना राबविणे,बूथ रचना राबविणे,नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करणे व नियुक्ती पत्र प्रदान करणे व सत्कार सोहळा पार पडणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा