कळस अकोले रस्ता दहा दिवसांत पूर्ण करणार !

कळस ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन स्थगित
अकोले - कोल्हार घोटी राजमार्ग ५० ह्या अकोले कळस रस्त्याचे काम दहा मीटर रुंदीचा रस्ता दहा दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने कळस बु ग्रामस्थांनचे आत्मक्लेश आंदोलन स्थगित करण्यात आले.
कळस येथील ग्रामपंचायत सरपंच तथा रिपाइंचे चे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, भाजपा तालुका सरचिटणीस माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना तालुका समनव्यक माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी संगमनेर अकोले तालुक्याचे सरहद्दीवर प्रवरा नदीच्या पुलावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उपविभागीय अभियंता जे. एम. कडाळे, उपविभागीय अभियंता संगमनेर सौरभ पाटील, शाखा अभियंता आर. डी. पाचोरकर, अकोले तालुका पोलीस निरीक्षक अभय परमार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी याबाबद मध्यस्ती करून आंदोलन मिटवले.कोल्हार घोटी राज्य महामार्गाचे काम भाजपा सरकारच्या काळात सुरू केले आहे. मात्र काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. अकोले तालुक्यातील गौण खनिज वापरून संगमनेर तालुक्यात काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील काम बंद आहे. अकोले तालुक्यातील रस्ता खूप खराब झाला आहे. रस्ता वरील वाहन वर्दळीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळी मुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. याबाबत रस्त्यावर पाणी मारणेचे काम केले जात नाही.
अकोले तालुक्यातील कळस ते अकोले हा रस्ता अतिशय खराब झाला असून खूप खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात घडत आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. अगस्ती कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक लोकानां आपला मार्ग बदलावा लागला आहे. तर अनेकांना पाठीचा व मणके चा आजार बळावला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन देऊन ही याबाबद कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे.
कोट:-
भाजपा सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंजूर केलेले रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून अकोले कळस हा रस्ता अकोले तालुका सरहद्दी पर्यंत चा रस्त्याचे काम बंद करून संगमनेर तालुका हद्दीत काम सुरू केले आहे. दहा दिवसांत जर काम झाले नाहीतर ठेकेदार चे एकही वाहन रस्त्यावर चालू देणार नाही.
भाऊसाहेब वाकचौरे
सरचिटणीस, भाजपा, अकोले तालुका

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा