कळस बुद्रुक कावडीला मानाच्या कावडीचा दर्जा प्राप्त

कळस बुद्रुक कावडीला मानाच्या कावडीचा दर्जा प्राप्त

अकोले - अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील कावडीला शंभु महादेव शिखर शिंगणापूर येथील मानाच्या कावडीचा दर्जा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकताच दिला आहे.
              छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेले मानपत्रात म्हटले आहे की, कळस बु येथील कळसेश्वर कावड हि सुमारे तीनशे वर्षांपासून येणारी मानाची कावड असून वंशपरंपरागत पध्दतीने सुमारे दोनशे ते अडीचशे भाविक चारशे किमी पायी दर्शनासाठी येतात. हि मानाची कावड असून मुंगी घाटातून येणारी पहिली कावड असून हत्ती सोंडेने त्रयोदशीला प्रस्थान करते असे गौरवास्पद शब्दात कावडीचा उल्लेख केला आहे. माण तालुक्याचे तहसीलदार यांना कळसेश्वर कावडीला मानाचा कावडीचा दर्जा देऊन सर्व यात्रेच्या बैठकींना निमंत्रित करण्याचा आदेश दिला आहे. दर्शनासाठी वेळ देण्यात यावा व मानाच्या कावडी च्या सुविधा पुरविण्याचे सांगितले आहे.
                 शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असून छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे मालकीचे आहे. चैत्र महिन्यात पंधरा दिवस हि यात्रा असते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या यात्रेत सहभागी होतात. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक आपल्या कावडी घेऊन येतात. शंभू महादेवाचे लग्न यावेळी लावले जाते. चैत्र त्रयोदशीला तेल्या भुत्याच्या कावडीच्या धारेने यात्रा समाप्त होते.
            कळस बु येथील कळसेश्वर देवस्थान व सुधाकर बाजीराव वाकचौरे, प्रकाश बाजीराव वाकचौरे यांच्या कुटुंबातील हि कावड शंभू महादेव शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यातील यात्रेसाठी दरवर्षी अनादी काळापासून ही वंशपरंपरागत पध्दतीने  जातात. प.पु. सुभाषपुरी महाराज यांच्या आशीर्वादाने हा यात्रा उत्सव भव्य स्वरूपात साजरा होऊ लागला पायी दोनशे तर बस, खाजगी वाहनाने हजारो भाविक यात्रेला जातात. या यात्रेत भाविकांची खूप गैरसोय होत होती. अनेक वर्षाची परंपरा असताना कोठेही नोंद नव्हती. मात्र कळस येथील युवकांनी ह्या नोंदणीसाठी उदयनराजे यांनचे कडे मागणी केली. सागर वाकचौरे, गोकुळ वाघ, संचित वाकचौरे, राजेंद्र वाकचौरे, विवेक वाकचौरे यांनी याकामी विशेष प्रयत्न केले.
              छत्रपती उदयनराजे यांचे मानपत्र मिळाले मुळे कळस येथील शंभू महादेव भक्तांनी नमो पारवते हर हर महादेवच्या गजरात जल्लोष केला. सत्यवान वाकचौरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आनंद व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, अशोक वाकचौरे, मच्छिंद्र भोर, संजय वाकचौरे, नवनाथ वाकचौरे, दिगंबर सरमाडे, रामनाथ वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, दशरथ वाकचौरे, सुमित वाकचौरे, सुरेश भुसारी, सतीश वाकचौरे, विजय बिबवे, स्वप्नील मेमाणे, मेजर सचिन वाकचौरे, रोहिदास वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरे, अजय वाकचौरे, सागर वाकचौरे, श्रीकांत वाकचौरे,  मनोज गांडाळ, शांताराम शिर्के, दत्तात्रय बिबवे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !