मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा !
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा !
भाजप महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांची मागणी
संगमनेर - शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा भाजप महिला मोर्चाच्या आक्रमक भूमिकेमुळेच द्यावा लागला.तसेच करुणा शर्मा प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही आपला राजीनामा द्यावा,अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केली.
संगमनेर येथे आयोजित केलेल्या बूथ रचना कार्यकारीणी बैठकीतून त्या बोलत होत्या.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या होत्या.तर व्यासपीठावर धनश्रीताई सुजय विखे पाटील,महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अँड वर्षाताई डहाळे,महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सुरेखाताई विध्ये,महिला मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्ष शैला मुळक, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर,जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन भाऊ दिनकर,भाजपच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी,महिला संघटन सरचिटणीस वंदना गोंदकर,कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे,भाजपचे अकोले तालुकाध्यक्ष सिताराम पाटील भांगरे,अकोलेच्या सभापती उर्मिला राऊत,युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे,सुनील वाणी,सतीश नागवडे,अशोक पवार आदी उपस्थित होते.
उमाताई खापरे पुढे म्हणाल्या की,भारतीय जनता पार्टी ही देशातील सर्वात मोठी पार्टी आहे.त्यामुळे महिलांनी न घाबरता अन्याया विरुद्ध पेटून उठले पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आदर्श असून त्यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून भाजप पक्ष घराघरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात चांगले काम करीत असून 2024 ला भाजप स्वबळावर सत्तेत असेल,असे आश्वासन ही खापरे यांनी दिले.
माजी आमदार कोल्हे आपल्या भाषणात म्हणाल्या की,हे तिघाडी सरकार स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र आले आहे.त्यांना सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांप्रती अजिबात ही निष्ठा नाही.हे तिघाडी सरकार उलथवून टाकायचे असेल तर सर्व महीला भागिनींनी एकत्र येऊन भाजपचे संघटनात्मक काम उभे करण्याची गरज आहे.महिलांनी आता चूल आणि मुलच्या पुढे जाऊन गगनभरारी घेतली आहे.त्यामुळे महिलांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात जागे होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे,असं ही सौ.कोल्हे म्हणाल्या.
यावेळी धनश्री विखे पाटील,दीपाली मोकाशी यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली कुलकर्णी यांनी केले तर नगरसेविका निकिता परदेशी यांनी मानले.कार्यक्रमाचे प्रास्तविक उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी केले.या कार्यक्रमात ऊत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,ती पुढीलप्रमाणे;-
*जिल्हा कार्यकारिणी*
*जिल्हाध्यक्षा*
सोनालीताई लक्ष्मीकांत नाईकवाडी
*उपाध्यक्ष*
अलका बापूसाहेब परजणे
सुनीता अशोक कानवडे
कांचनताई राजेंद्र मांढरे
सोनाली हेमंत बनभेरू
लताताई बापूसाहेब देशमुख
पुष्पाताई दीपक भांगरे
नजराणा जावेद सय्यद
कमलताई विष्णू भारस्कर
रेश्मा संजय खांडरे
विजया संदीप देवकर
*संघटन सरचिटणीस*
वंदना राजेंद्र गोंदकर
*सरचिटणीस*
सुप्रिया प्रकाश धुमाळ
नंदाताई राजेंद्र भंडारी
*सचिव*
माधुरी भारत धूळगंड
मनिषा भाऊसाहेब फुलारी
मंदाताई गणपत बराते
नंदाताई भिमराज भुसे
पुष्पाताई रामचंद्र कपिले
सुरेखा सुनील खरे
जयश्री कैलास दहातोंडे
ज्योती नरेन्द्र बंग
अलका शरद दिघे
अर्चना पंढरीनाथ खर्डे
*कार्यालयीन सचिव*
वंदना अंबादास दातीर
बिना विनय भगत
*कोषाध्यक्ष*
जयश्री आनंद भरीतकर
*सोशल मिडिया सहसंयोजक*
रुपाली नितीन उंडे
*कार्यकारिणी सदस्य*
शोभाताई कुंदनसिंह परदेशी
मीनाताई गणेश राठी
पुष्पाताई दत्तात्रय वाणी
सविता सिद्धार्थ बागुल
सीताबाई लक्ष्मणभाऊ उगलमुगले
कीर्ती चेतन बनकर
वैशाली नितीन जोशी
अपर्णा अक्षय वरपे
रत्ना सचिन कदम
मंगल अंकुश काळे
अनिता बबन कोलते
उर्मिला राजाराम राऊत
*कायम निमंत्रित सदस्य*
हेमलता मधुकरराव पिचड
मा.आ.स्नेहलताताई बिपीनराव कोल्हे
आशाताई बाळासाहेब मुरकुटे
धनश्री सुजय विखे पाटील
*प्रकोष्ठ सेल*
शिक्षिका - साधना प्रदिप पटारे
डॉक्टर-मंगला किसन गाडेकर
वकील-रेश्मा योगेश मुंदडा
बचतगट-प्रतिभा राजेश सूर्यवंशी
आशावर्कर - रेश्मा अमोल गोडसे
पत्रकार-वैशाली प्रसाद कुलकर्णी
सेवावस्ती -सुनिता अनिल टाक
सहकारी संस्था - सोनाली संदीप दातखिळे
अंगणवाडी सेविका - आशा राजेंद्र ढगे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा