कोंभाळणे येथील जळीत कांडातील कुटुंबियांना गायकर यांच्याकडून 21 हजाराची मदत

अकोले ;- अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे झालेल्या जळीत कांडातील कुटुंबियांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी भेट घेतली.यावेळी सिताराम पाटील गायकर यांनी या कुटुंबियांना 21 हजार रुपयांची रोख रक्कम देऊन मदत केली.
चार दिवसांपूर्वी कोंभाळणे येथे लागलेल्या आगीत गावंडे, पथवे,मेंगाळ या कुटुंबाच्या घराची राखरांगोळी झाली.त्यामुळे या कुटुंबातील नागरिकांच्या अंगावर फक्त कपडे शिल्लक राहिले होते.त्यांचा सर्व संसार जळून भस्मसात झाला होता.या गरीब आदिवासी कुटुंबांना आपले काहीतरी देणे लागते,या उदात्त हेतूने सिताराम पाटील गायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज कोंभाळणे येथे पीडित कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी तब्बल महिनाभर पुरेल इतका किराणा बाजार व 21 हजार रुपयांची रोख रक्कम सिताराम पाटील गायकर यांनी सुपूर्द केली.यावेळी सिताराम पाटील गायकर म्हणाले की,या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.या कुटुंबाच्या घराच्या शेडसाठी अगस्ती साखर कारखान्याच्या वतीने देखील मदत केली जाईल,असे आश्वासन ही गायकर यांनी दिले.घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या कुटुंबा सोबत असल्याचे ही गायकर म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा