ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी संस्थेतील मुलांना एक हात मदतीचा
ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी संस्थतील मुलांना एक हात मदतीचा
संगमनेर ;- संगमनेर येथील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्था संचलित बालगृहाला भारत संचार निगम लिमिटेडचे सेवा निवृत्त अधिकारी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव मारुती गायकर साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे "एक हात मदतीचा गोर गरीब मुलांच्या आधाराचा" या संकल्पनेतुन 10 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून संस्थेला दिले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुणजी इथापे यांच्याकडे 10 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.प्रियदर्शनी संस्था ही एक नावजलेली संस्था असून या संस्थेत अनेक निराधार मुले, मुली आश्रयास असून डॉक्टर अरुण इथापे हे सेवाभावी काम गेले तीस वर्षांपासून करीत आहेत.संस्थेस सध्याच्या स्थितीला मदतीची गरज असून आज ज्ञानदेव गायकर यांनी सामाजिक भावनेतून आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही मदत केली.अकोले तालुक्यातील गायकर परिवार नेहमीच त्यांच्या परिवारातील सदस्य यांचे वाढदिवस सामाजिक संस्थांना मदत देऊन सामाजिक उपक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून साजरे करत आले आहेत.
याप्रसंगी बोलताना ज्ञानदेव गायकर म्हणाले की,सध्याच्या परिस्थितीत प्रियदर्शनी संस्थेला आपल्या मदतीची गरज असून मी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. तसेच यापुढे देखील मदत करत राहील.आपण समाजासाठी काही तरी चांगले काम केले पाहिजे.या भावनेतून मी आणि माझ्या परिवारातील सदस्य यांचा वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अनेक संस्था , दुर्गम भागातील शाळा ,
आश्रमशाळा यांना विविध उपयोगी वस्तू यांची मदत करून साजरा करत असतो,असे ते म्हणाले.
याप्रसंगी दौलत इस्टेटचे संचालक गोरखशेठ गाडे , गंगासृष्टी प्रोजेक्टचे संचालक विशाल शेठ गुंजाळ पाटील , साई एंटरप्राईजेसचे संचालक इंजि.निलेश गायकर पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा