सोनाली नाईकवाडी यांनी जपली सामाजिक बांधिलकी
सोनाली नाईकवाडी यांनी जपली सामाजिक बांधिलकी
अकोले,समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत
अकोले - भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांनी,कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अकोले व समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी औषधे उपलब्ध करून दिली आहे.
अकोलेच्या कोविड सेंटरसाठीची औषधे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्विकारली.तर समशेरपूर येथील मधुकररावजी पिचड साहेब यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला देखील मुबलक प्रमाणात औषधे देण्यात आली.ही औषधे आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा अमृतसागर दुधसंघाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचौरे व युवानेते संदिप दराडे यांनी स्विकारली.तसेच समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी मिनरल वॉटर म्हणून पाणी बॉटलचे 100 बॉक्स देखील सोनाली नाईकवाडी यांनी सुपूर्द केले.तसेच विरगाव व अगस्ती आश्रम येथील गोशाळांना चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरवा चारा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सोनाली नाईकवाडी यांच्या या दातृत्ववादाचे कौतुक होत असून अकोले तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.सोनाली नाईकवाडी यांचा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो.येत्या काही दिवसांत अकोले शहरात सोनाली नाईकवाडी यांच्या नावाने एक कोविड सेंटर उभे केले जाणार आहे यावेळी उद्योजक चेतनराव नाईकवाडी,भाजपचे जिल्हा संयोजक संदिप दातखिळे,पप्पू वाकचौरे,सचिन नाईकवाडी, संजय बोडके आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा