जनतेला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे अन गुन्हेगारांना धाक
जनतेला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे अन गुन्हेगारांना धाक
आ.डॉ.किरण लहामटेंनी केली एपीआय घुगेंची कानउघडणी
अकोले - सामान्य नागरिकांना पोलीसांचा आधार वाटला पाहिजे,अन गुन्हेगारांना धाक वाटला पाहिजे,अशा शब्दांत आ.डॉ.किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची कानउघडणी केली.
अकोले शहरात आज एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे सर,जेष्ठ नेते तथा अगस्तीचे संचालक सुरेशराव गडाख,महिला तालुकाध्यक्षा स्वातीताई शेणकर,युवक तालुकाध्यक्ष रविभाऊ मालुंजकर,चंद्रभान नवले सर,भाविक खरात,
अमित नाईकवाडी,भागवत शेटे,संदिप शेणकर,डॉ.रामहरी चौधरी,राज वाकचौरे,अभिजित वाकचौरे,
आदी उपस्थित होते. या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास एपीआय मिथुन घुगे यांनी धावती भेट दिली.यावेळी आ.डॉ.किरण लहामटे यांनी एपीआय मिथुन घुगे यांचे अकोले तालुक्याचे वतीने स्वागत केले.पोलीस म्हटले की सामान्य नागरिकांना आधार वाटण्या ऐवजी भीती वाटते,त्यामुळे पोलीसांचा सामान्य नागरिकांना आधार वाटला पाहिजे अन गुन्हेगारांना धाक वाटला पाहिजे, अशी समज यावेळी आमदारांनी एपीआय मिथुन घुगे दिली.यावेळी एपीआय मिथुन घुगे यांनी देखील होकार दर्शवत सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी पोलीस उभे राहतील,असे आश्वासन दिले.घुगे यांनी पदभार स्विकारताच अकोले तालुक्यातील अनेक अवैध धंद्यांवर धाडी टाकून काही आरोपींना जेरबंद केले आहे.त्यामुळे काही प्रमाणात अवैध धंद्यांना लगाम बसला आहे.
अमोल शिर्के,संपादक अकोले टाईम्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा