मयत संतोष गावंडेच्या कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान !

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतमजुरांच्या कुटुंबास वनविभागाची पाच लाखांची मदत

अकोले - अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथिल संतोष कारभारी गावंडे हा शेतमजूर धुमाळवाडी येथे शेतकामाला गेला असता आपले काम उरकुन घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता.त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.ही बाब उघडकीस आल्यानंतर वनविभाग व धुमाळवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला .यानंतर वनविभागाने तातडीने पाठपुरावा करत आज अखेर सदर कुटुंबास मदतीचा पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपयाचा धनादेश अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सीताबाई गावंडे व त्यांच्या वारसांना देण्यात आला.एकुण पंधरा लाख मदत वन खात्याकडून देणार असल्याची माहिती अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले यांनी दिली. 
सदर घटनेची पहाणी करून पिडीत कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन श्री नितीन गुदगे मुख्य वनरक्षक नाशिक व आनंद रेड्डी येल्लो IFS उपविभागीय वनाधिकारी संगमनेर यांनी दिले होते.या आदिवासी कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देत असताना श्रीमती भाग्यश्री पोले वनपरिक्षेत्र अधिकारी अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे ,धुमाळवाडी धामणगाव आवारी पोलीस पाटील प्रणालीताई प्रशांत धुमाळ, वनपाल विठ्ठल पारधी, वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे विवेक राजेंद्र सदगीर उत्तम पोखरकर त्रिंबक देशमुख आदी वन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सदर धनादेश सुपूर्द करत असताना अकोले तालुका शिवसेनाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास तिकांडे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, धामणगाव आवारीचे ग्रामस्थ आप्पासाहेब आवारी,बाळासाहेब भोर बाळासाहेब लक्ष्मण आवारी,सरपंच पूनम आवारी, उपसरपंच गणेश पापळ,धुमाळवाडीचे सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे,माजी सरपंच किसन आवारी, अकोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती संदीप शेणकर, सुरेश गडाख,सुरेश खांडगे, ईश्वर वाकचौरे,अक्षय आभाळे,सौ नीता आवारी,सौ भाग्यश्री विजय आवारी आदी मान्यवर उपस्थित होते.गांवडे यांचे कुटुंब हे मोलमजुरी करुन आपली गुजराण करत होते.
कुटुंबातील कर्ता माणूस गमावल्याने व कुटुंबास तातडीच्या मदतीची गरज होती.आज वेळेवर मदत मिळाल्याने धामणगाव आवारी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.या पुढिल मदतीचा टप्पा हा योग्य वेळेत मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व कुटुंबीयांनी वनविभागाकडे व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई

एका पदाधिकऱ्याची लवकरच होणार हकालपट्टी !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !