संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई
संगमनेर महसूल विभागाची अकोलेतील सेनेच्या कार्यकर्त्यावर कारवाई संगमनेर - संगमनेर महसूल खात्याची परवानगी न घेता व्यवसायासाठी जागा वापरल्या बद्दल अकोलेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर संगमनेरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर शिवारातील गुंजलवाडी येथे शेती कसण्यासाठी घेतलेल्या जमिनीत विना परवानगी बेकरी प्रोडक्ट, लोखंडी खिळे आदी व्यवसाय अनधिकृतपणे सुरू केल्याबद्दल अकोले येथील सुभाष भागूजी कानवडे,गणेश भागूजी कानवडे व बाळकृष्ण धोंडीबा भागवत (रा.गुंजाळवाडी) यांच्यावर संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी कारवाई केली आहे.या प्रकरणी सचिन संपतराव गुंजाळ यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता कोणत्याही शासकीय परवानग्या न घेता त्या जमिनीवर बेकायदेशीरपणे व अनधिकृतरित्या वेगवेगळ्या मोठ्या शेड उभारून त्यात व्यावसायिक उत्पादने घेत असल्याची हरकत सचीन गुंजाळ यांनी घेतली होती.त्यानुसार या प्रकरणी संबंधित बांधकाम हे एम.आर.टी.पी.ऍक्टच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.कायद्यातील...