जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ! अकोले = कोरोना प्रार्दुभावकाळात रक्तादानाचे महत्व ओळखत अकोले तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वतिने आज रक्तदान शिबीर सर्वज्ञ हॅास्पिटल येथे संपन्न झाले. कोरोना काळात अनेक संस्था तालुक्यात दातृत्वासाठी पुढे येत आहे .अगस्ती सहकारी साखर करखान्याने सुरु केलेले कोविड सेंटर तालुक्यासाठी वरदान ठरले तर अमृतसागर दुध संघ,महीला ग्रामीण पतसंस्था, रोटरी क्लब अकोले,सह अनेक संस्थांनी कोविड काळात अकोलेतील नागरीकांसाठी मोठी मदत करत वैद्यकीय सेवेसाठी योगदान दिले आहे .अशाच प्रकारे आज अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी रक्तदान करत योगदान दिले.आज डॅा.रविद्र गोर्डे यांच्या सर्वज्ञ हॅास्पिटल मध्ये अर्पण ब्लड बॅक संगमनेर यांच्या मदतीने शिक्षकांनी रक्तदान शिबीर आयोजित करत यामध्ये ४० शिक्षकांनी रक्तदान केले.यावेळी अकोले तालुक्यातील जिल्हापरीषद शाळेतील शिक्षक श्री प्रतिक नेटके,श्री सतिश जाधव,श्री अर्जुन तळपाडे,श्री सतिश वैद्य,सचिन गवांदे,संतोष सदगीर,रुप...