कळस बुद्रुक कावडीला मानाच्या कावडीचा दर्जा प्राप्त

कळस बुद्रुक कावडीला मानाच्या कावडीचा दर्जा प्राप्त अकोले - अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील कावडीला शंभु महादेव शिखर शिंगणापूर येथील मानाच्या कावडीचा दर्जा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकताच दिला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेले मानपत्रात म्हटले आहे की, कळस बु येथील कळसेश्वर कावड हि सुमारे तीनशे वर्षांपासून येणारी मानाची कावड असून वंशपरंपरागत पध्दतीने सुमारे दोनशे ते अडीचशे भाविक चारशे किमी पायी दर्शनासाठी येतात. हि मानाची कावड असून मुंगी घाटातून येणारी पहिली कावड असून हत्ती सोंडेने त्रयोदशीला प्रस्थान करते असे गौरवास्पद शब्दात कावडीचा उल्लेख केला आहे. माण तालुक्याचे तहसीलदार यांना कळसेश्वर कावडीला मानाचा कावडीचा दर्जा देऊन सर्व यात्रेच्या बैठकींना निमंत्रित करण्याचा आदेश दिला आहे. दर्शनासाठी वेळ देण्यात यावा व मानाच्या कावडी च्या सुविधा पुरविण्याचे सांगितले आहे. शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असून छत्रपती उदयनराज...