मयत संतोष गावंडेच्या कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान !

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतमजुरांच्या कुटुंबास वनविभागाची पाच लाखांची मदत अकोले - अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथिल संतोष कारभारी गावंडे हा शेतमजूर धुमाळवाडी येथे शेतकामाला गेला असता आपले काम उरकुन घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता.त्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.ही बाब उघडकीस आल्यानंतर वनविभाग व धुमाळवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला .यानंतर वनविभागाने तातडीने पाठपुरावा करत आज अखेर सदर कुटुंबास मदतीचा पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपयाचा धनादेश अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते मयताच्या पत्नी सीताबाई गावंडे व त्यांच्या वारसांना देण्यात आला.एकुण पंधरा लाख मदत वन खात्याकडून देणार असल्याची माहिती अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले यांनी दिली. सदर घटनेची पहाणी करून पिडीत कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन श्री नितीन गुदगे मुख्य वनरक्षक नाशिक व आनंद रेड्डी येल्लो IFS उपविभागीय वनाधिकारी संगमनेर यांनी दिले होते.या आदिवासी कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द...