गुरव जोडो व गुरव समाज जनगणना अभिनयास सुरुवात
संगमनेर – अखिल गुरव समाज संघटनाच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथील यशोधन हॉलमध्ये अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर उत्तर पदाधिकारी बैठक घेऊन, गुरव जोडो व गुरव समाज जनगणना अभिनयास शुभारंभ झाला. महाराष्ट्रात गुरव समाज मोठ्या संख्येने असूनही जनगणने अभावी संख्या निश्चित नसल्याने समाजाचा राजकीय प्रभाव पडत नाही. म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाने अखिल गुरव समाज संघटने मार्फत होणाऱ्या जनगणनेत सहभागी व्हावे. गुरवांची संख्या कळाल्यावर समाजाचा राजकीय दबाव तयार होईल, असे अखिल गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शिंदे म्हणाले. ते संगमनेर येथे आयोजित केलेल्या समाज बांधवांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी संघटनेचे मानद अध्यक्ष वसंत बंदावणे सर, सुरेखा ताई तोरडमल,महिला प्रदेश अध्यक्ष, सुभाष (अण्णा)शिंदे, मुख्य सरचिटणीस, मनिषा ताई पांडे,महिला मुख्य सरचिटणीस, अशोक पांडे,राज्य कार्याध्यक्ष, संजय घोडके,राज्य उपाध्यक्ष, रमेश क्षिरसागर,देवस्थान समिती सरचिटणीस यांनी मार्गदर्शन केले, तसेच...